Daler Mehndi Arrested : आर्थिक फसवणूक प्रकरणी गायक दलेर मेहंदीला अटक, पटियाला कोर्टाने पाठवले तुरुंगात


चंदीगड – पंजाबी गायक दलेर मेहंदी याला पटियाला पोलिसांनी अटक केली आहे. 2003 मध्ये मेहंदीवर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी त्यांना यापूर्वी दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला होता. या शिक्षेला त्यांनी पटियालाच्या सत्र न्यायालयात आव्हान दिले. तेथे शिक्षा कायम ठेवण्यात आली. यानंतर त्याला गुरुवारी पटियाला पोलिसांनी अटक केली. दलेर मेहंदीची रवानगी पटियाला मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

काय होते प्रकरण
2003 मध्ये बलवेडा गावातील रहिवासी बक्षीश सिंग यांच्या तक्रारीवरून सदर पतियाळा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी दलेर मेहंदी, त्याचा भाऊ शमशेर सिंग, ध्यानसिंग, बुलबुल मेहता यांच्या विरोधात लाखोंची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दलेर मेहंदीने परदेशात पाठवण्याच्या नावाखाली 13 लाख रुपये घेतल्याची तक्रार बक्षीश सिंह यांनी केली होती, पण नंतर त्याला परदेशात पाठवले नाही आणि पैसे परत केले नाहीत.