इस्रोच्या ‘व्योममित्र’ चे गगनयान मिशन मध्ये योगदान

इस्रो पुढील वर्षात गगनयान मोहीम लाँच करून नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेचे वैशिष्ट म्हणजे मानवरहित गगनयान चाचणी मध्ये सामील होणारा इस्रोचा रोबो व्योममित्र. हा हाफ ह्यूमनाइज्ड महिला रोबो अंतराळातून गगनयानचे फोटो काढून पाठविणार आहे. भारतीय वैज्ञानिकांचे हे मोठे यश मानले जात आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये रशियाने मानवरहित रॉकेट सह फेडोर रोबो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर पाठवला होता. इस्रोने २२ जानेवारी २०२० मध्ये प्रथम बंगलोर येथील आंतरराष्ट्रीय अॅकेडमी ऑफ अॅस्ट्रोनॉमी व अॅस्ट्रोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया संमेलनात महिला रोबो व्योममित्रचा परिचय करून दिला होता. हे संस्कृत नाव आहे. त्याचा अर्थ व्योम म्हणजे अंतराळ आणि मित्र म्हणजे दोस्त असा आहे.

इस्रो पहिल्या चाचणीत मानवरहित विमान पाठविणार आहे. दुसऱ्या चाचणीत व्योममित्र तर तिसऱ्या चाचणीत दोन अंतराळवीर जाणार आहेत. २०२२ मध्ये पहिली चाचणी घेतली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी ठरल्या तर अंतराळ आधारित मानव मिशन सेवा क्षेत्रात भारत वर्ल्ड लीडर म्हणून गणला जाईल.