दीपिकाच्या हूबहुचे फोटो व्हायरल
बॉलीवूड कलाकाराचे हूबहु म्हणजे अगदी त्यांच्या सारखे दिसणारे दुसरे व्यक्ती यांची नेहमीच चर्चा होत असते. सेलेब्रिटी प्रमाणे दिसणारे सामान्य लोक यामुळे अनेकदा चर्चेत येतात, काही काळ त्यांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. सध्या बॉलीवूड मध्ये टॅलेंटेड, सुंदर मानली जाणारी आणि जिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे अश्या दीपिका पदुकोनच्या दुप्लीकेट किंवा हूबहुची जोरदार चर्चा होत आहे.
रीजुता घोष देब असे या तरुणीचे नाव असून सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. रीजुता हुबेहूब दीपिका सारखी दिसते. रीजुता डिजिटल कंटेंट क्रिएटर आहे. तिचे फोटो व्हायरल होताच त्यावर कॉमेंटचा पाउस पडला आहे. काही लोकांनी तिला दीपिका २.० म्हटले आहे तर कुणी रणवीरच्या नजरेला पडू नको नाहीतर तो गोंधळून जाईल अशी कॉमेंट केली आहे.
दीपिकाचा गहराईया हा चित्रपट नुकताच येऊन गेला पण त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. आगामी काळात दीपिका शाहरुख सोबत ‘पठाण’ मध्ये दिसणार आहे. शिवाय ऋतिक रोशन बरोबर तिचा एक चित्रपट येत असून या दोघांनी प्रथमच एकत्र काम केले आहे. शिवाय प्रभास आणि बिग बी बरोबर सुद्धा दीपिकाचा एक चित्रपट येत आहे.