भारतातील आयसीसी वर्ल्ड कप मध्ये द.अफ्रिकेला थेट प्रवेश अवघड

पुढील वर्षी भारतात होत असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये द. आफ्रिका संघ थेट क्वालिफाय करू शकणार नाही असे संकेत मिळाले आहेत. द. आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया विरुध्द वन डे आंतरराष्ट्रीय मालिका रद्द केली असून ही मालिका तीन सामन्यांची होती. त्यामुळे आयसीसी वर्ल्ड कप २०२३ मध्ये सुपरलीगचे हे अंक ऑस्ट्रेलियाला मिळणार आहेत. सध्या द. आफ्रिका आयसीसी गुणतालिकेत ११ व्या नंबर वर आहे.

आफ्रिकेने मालिका रद्द केल्यामुळे ते ३० गुण ऑस्ट्रेलियाला मिळणार आहेत. परिणामी द. आफ्रिका संघाचा नंबर आणखी खाली जाईल आणि त्यामुळे त्यांना क्वालिफिकेशन राउंड पासून सुरवात करावी लागणार आहे. द. आफ्रिका जास्त वन डे खेळणार नसल्याने ते थेट क्वालिफाय होऊ शकणार नाहीत. जानेवारी मध्येच ऑस्ट्रेलियात वन डेची मालिका खेळायची होती पण ती द.आफ्रिकेने रद्द केली आहे त्यामुळे द. आफ्रिकेची टीम फक्त कसोटी मालिका खेळून मायदेशी जाणार आहे.

द. आफ्रिका प्राथमिक फेरीपासून खेळून वर्ल्ड कप मध्ये एन्ट्री करू शकते पण त्यांसाठी त्यांना सातत्याने अधिक वन डे खेळावे लागतील असे समजते.