देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी?
महाराष्ट्रात नुकत्याच सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपती निवडणूक पार पडल्यावर होणार असल्याचे वृत्त असून यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते सोपविले जाणार असल्याची चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृह खाते हवे होते पण ते चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे जाईल असेही सांगितले जात आहे. देवेंद्र याच्याकडे अर्थ खाते सोपविण्यामागे भाजपची खास योजना असल्याचेही बोलले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली भेटीत केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती तेव्हाच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाबाबत चर्चा झाली असे समजते. मिडिया रिपोर्ट नुसार राजकारण तज्ञाच्या मते देवेंद्र याच्याकडे अर्थ खाते देण्यामागे भाजपचा मास्टर प्लॅन आहे. देवेंद्र यांच्याकडे अर्थ बरोबरच जलसिंचन खाते येईल जे भाजपसाठी मदतीचे ठरणार आहे. यामुळे भाजपने काय पातळीवर राज्यात काम केले आहे हे सिद्ध होणार आहे. पुढच्या अडीच वर्षात भाजपला ठळकपणे जनतेसमोर केलेले काम आणायचे आहे आणि त्यासाठी अर्थ खाते भाजपच्या ताब्यात असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले जात आहे.