अखेर आला नथिंग १ स्मार्टफोन
गेले अनेक दिवस चर्चेत असलेला नथिंग १ स्मार्टफोन अखेरी सादर झाला आहे. या फोनचे लाँचिंग जागतिक बाजारात एकाच वेळी केले गेले असून तो भारतात सुद्धा सादर झाला आहे. नथिंगचा पहिला स्मार्टफोन ग्लीम्फ इंटरफेस सह असून त्याच्यावर एलईडी स्ट्राईप्स आहेत. हा फोन ८ जीबी रॅम, १२८ आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरीयंट मध्ये आहे. शिवाय त्याचे आणखी एक हाय व्हेरीयंट १२ जिबी रॅम ,२५६ स्टोरेजसह सादर झाले आहे. या फोनच्या किंमती अनुक्रमे ३२९९९,३५९९९ आणि ३८९९९ रुपये आहेत. २१ जुलैला सायंकाळी ७ वा. तो फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. काळा आणि पांढरा अश्या दोन रंगात हा फोन मिळेल.
प्री ऑर्डरसाठी कंपनीने काही ऑफर्स दिल्या आहेत. त्यात दोन हजार रुपये एचडीएफसी इंस्टंट डिस्काऊंट, ३ व ६ महिने ईएमआय, शिवाय एक्स्चेंज ऑफर आहे. या फोनसाठी ड्युअल सिम नॅनो सपोर्ट, अँड्राईड १२ ओएस, ५ जी, ४ जी, वायफाय सहा, वायफाय सहा डायरेक्ट असे अनेक कनेक्टीव्हिटी ऑप्शन आहेत. युएसबी टाईप सी पोर्ट, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ३३ डब्ल्यू वायर्ड चार्जिंग, १५ डब्ल्यू वायरलेस चार्जिंग आणि ५ डब्ल्यू रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे,
या फोनसाठी ६.५५ इंची ओलेड डिस्प्ले कॉर्निग ग्लास प्रोटेक्शनसह आहे. रिअरला ड्युअल कॅमेरा असून प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा सोनीचा तर दुसरा अल्ट्रा वाईड सेन्सर आहे. फ्रंटला १६ एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. पॅनोरमा, नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, सिम डिटेक्शन, एक्स्ट्रीम नाईट मोड, एक्स्पर्ट मोड, इनडिस्प्ले फिंगर प्रिंट सेन्सर अशी त्याची अन्य फीचर्स आहेत.