Bank Loan: BOB चे कर्ज महाग, बँक ऑफ महाराष्ट्राचे स्वस्त, जाणून घ्या आता काय आहेत दर


नवी दिल्ली – बँक ऑफ बडोदाने कर्ज 0.15 टक्क्यांनी महाग केले आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्राने व्याजदरात 0.35 टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन व्याजदर 11 जुलैपासून लागू झाला आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने सांगितले की, एक वर्षाचा MCLR 7.70 वरून 7.50 टक्के कमी केला जाईल तर तीन महिन्यांचा MCLR 0.35 टक्क्यांनी कमी करून 7.20 टक्के केला जाईल. एका महिन्याच्या कर्जाचा दर 6.90 टक्के असेल.

बँक ऑफ बडोदाने सांगितले की, 3 महिने आणि 6 महिन्यांसाठी MCLR चा दर 7.35 ते 7.45 टक्के असेल तर एक वर्षाचा दर 7.50 ते 7.65 टक्के असेल. नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी 12 जुलैपासून नवीन दर लागू होणार आहेत. दुसरीकडे, युनियन बँकेनेही MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून 6.80 टक्के केला आहे. हे दरही सोमवारपासून लागू झाले आहेत.

मारुती एसयूव्ही ग्रँड विटारासाठी बुकिंग सुरू
मारुती सुझुकीने सोमवारी सांगितले की ग्राहक 11,000 रुपयांपासून मध्यम आकाराची SUV Grand Vitara बुक करू शकतात. त्याची स्पर्धा क्रेटा, किया आणि हॅरियरशी होईल. हे सणासुदीच्या काळात लॉन्च केले जाऊ शकते. कंपनीने अलीकडेच SUV Brezza ही 7.99 लाख ते 13.96 लाख रुपयांना लॉन्च केली आहे.