६९ व्या वर्षी पुन्हा पिता होणार पुतीन
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन वयाच्या ६९ व्या वर्षात पुन्हा एकदा पिता बनत आहेत. रशियाची माजी जिमनास्ट अलींना काबेवा पुतीन यांची गर्लफ्रेंड आहे. तिला पुतीन यांच्यापासून अगोदर दोन मुले आहेत. आता पुन्हा एकदा तिला मुलगी होणार असल्याचे जनरल एसव्हीआर टेलिग्राम चॅनल वरून सांगितले गेले आहे.
डेली स्टारने क्रेमलिन अपडेट वेब अकौंटचा संदर्भ देऊन दिलेल्या बातमीनुसार पुन्हा एकदा वडील होणार या बातमीने पुतीन नाराज आहेत. ३९ वर्षीय अलींना ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेती असून तिच्या आणि पुतीन यांच्या अफेअरची चर्चा दीर्घकाळ होत आहे. पुतीन यांनी उघडपणे मात्र त्यावर कधीच भाष्य केलेले नाही. पुतीन त्यांचे खासगी आयुष्य नेहमीच गुप्त ठेवत आले आहेत. पुतीन यांच्या बरोबर असलेल्या खास नात्यामुळेच अलींना प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
नवीन अपत्य जन्माला येणार यामुळे पुतीन बेचैन झाले आहेत. पुतीन यांना नक्की किती मुले मुली आहेत याचा खुलासा कधीच झालेला नाही. पण त्यांची पहिली पत्नी ल्युडमिला हिला दोन मुली आहेत आणि या दोघीही प्रसिद्ध आहेत. पैकी एक डॉक्टर आहे. पुतीन यांनी ल्युडमीला यांना घटस्फोट दिला आहे. अलीनाने जिमनॅस्टीक मधून निवृत्ती घेतल्यावर राजकारणात प्रवेश केला आहे. तिने काही काळ संगीताचे शिक्षण सुद्धा घेतले असून तिला त्यात फार यश मिळविता आले नाही असे सांगितले जाते.