रणवीर- दीपिका बनणार शाहरुखचे शेजारी
बॉलीवूड मधील लोकप्रिय जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन यांनी मुंबई आणि आसपास बऱ्याच प्रोपर्टी खरेदी केल्या आहेत. ताज्या बातमी नुसार आता ते शाहरुख आणि सलमान यांचे शेजारी बनत आहेत. बांद्रा परिसरात ‘सागर रेशम ‘ या अलिशान इमारतीत त्यांनी सी फेसिंग सुंदर घर खरेदी केले आहे. ही इमारत शाहरुखच्या मन्नत आणि सलमानच्या गॅलेक्सी या निवासस्थानांच्या अगदी जवळ आहे. रणवीर आणि दीपिका यांनी या इमारतीत १६,१७,१८,१९ मजल्यावर ११२६६ चौरस फुट कार्पेट एरिया आणि १३०० चौरस फुट स्पेशल छत असलेले हे घर खरेदी केले आहे.
या ठिकाणी जागेचा दर प्रती चौ.फुट १ लाख रुपये आहे. म्हणजे रणवीर आणि दीपिका यांनी या जागेसाठी किमान ११९ कोटी रुपये दिले आहेत. रणवीरने या घरासाठी ७.१३ कोटी मुद्रांक शुल्क भरले असल्याचे सांगितले जात आहे. या घराला १९ पार्किंग एरिया आहेत.
रणवीर याचा आलीया भट्ट सोबतचा रॉकी और रानी कि प्रेमकहाणी हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. त्याशिवाय रोहित शेट्टीच्या सर्कस मध्येही रणवीर दिसणार आहे.