नितीन गडकरी टीमचे आणखी एक रेकॉर्ड, महामेट्रोचा सर्वाधिक लांब डबलडेकर पूल

केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या विभागाने नवे रेकॉर्ड नोंदविले आहे. नागपूरच्या वर्धा रोडवर राष्ट्रीय महामार्गावर आशिया मधील सर्वाधिक लांबीचा डबलडेकर मेट्रो पूल व डबलडेकर पूल बांधला गेला असून या मार्गावर तीन मेट्रो स्टेशन आहेत. त्यामुळे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये महामेट्रोचे नाव नोंदले गेले आहे.

या संदर्भात नितीन गडकरी यांनी ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात,’ आणखी एक जागतिक रेकॉर्ड. नागपूर येथे हे रेकॉर्ड केले गेले असून त्याबद्दल महामेट्रो टीम आणि एनएचएआय टीमचे हार्दिक अभिनंदन. हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रो रेल सह ३.१४ किमी लांबीचा सर्वात मोठा पूल सिंगल कॉलम पिलर्सवर आधारित बांधला गेला आहे. देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. या प्रकल्पातील इंजीनीअर्स, अधिकारी आणि कामगार यांना मनापासून धन्यवाद आणि सलाम. त्यांनी रात्रंदिवस राबून हे काम पूर्ण केले आहे.’