खासगी संग्रहाकाने १०० कोटींना खरेदी केली ही खास व्हिस्की

दारू, बिअर, व्हिस्की यांचे सेवन हानिकारक आहे असे मानले जाते. मात्र या तिन्ही प्रकारचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत. बरेच जण या पेयांचे संग्राहक आहेत आणि काही खास चीज मिळत असेल तर पाण्यासारखा पैसा त्यासाठी खर्च करण्यास तयार असतात. त्यांच्या कडे विविध प्रकारच्या मद्यांचा संग्रह असतो. नुकतीच एक दुर्मिळ, एकल माल्ट नोव्हेंबर १९७५ची स्कॉच व्हिस्की २० मिलियन डॉलर्स म्हणजे १०० कोटी रुपयांना एका खासगी संग्रहाकाने खरेदी केली आहे. या खरेदीने त्याने एप्रिल मध्ये १.२ मिलियन डॉलर्सला विकल्या गेलेल्या विस्कीचे रेकॉर्ड तोडले आहे.

गार्डियनच्या रिपोर्टनुसार आयबेग ओनर व गेल्नमोरंगी लग्झरी गुड्स ग्रुपच्या सहाय्यक कंपनीचे अध्यक्ष थॉमस मोरादपोर यांनी ही कास्क नं.३ स्कॉच व्हिस्की येथील स्थानिक समुदायासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. २०७ वर्षापूर्वी स्कॉटीश बेट इस्लेच्या अर्दबेग डीस्टलरी मध्ये या विस्कीचा पूर्ण स्टॉक विकला गेला होता. आता पुढील पाच वर्षे दरवर्षी ८८ बाटल्या ग्राहकांना दिल्या जाणार आहेत. एका बाटलीची किंमत ४३ हजार डॉलर्स असून या व्हिस्कीचा स्वाद शब्दात वर्णन करता येत नाही अशी तिची ख्याती आहे.