मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांचे निधन, निधनाच्या वृत्ताला मेदांता हॉस्पिटलचा अधिकृत दुजोरा


लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची दुसरी पत्नी साधना गुप्ता यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे. मात्र, गुडगावमधील मेदांता हॉस्पिटलने अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मागील आठवड्यातच साधना गुप्ता यांना साखरेसह इतर अनेक आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलायम सिंह यादव गुडगावला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.

2003 मध्ये मुलायम यांनी साधना गुप्ता यांना पत्नी म्हणून स्वीकारले होते. प्रतीक यादव हा त्यांचा मुलगा. प्रतीकची पत्नी अपर्णा यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता.