हे हँडसम हिरो प्रत्यक्षात आहेत टकलू

आपल्याकडे चित्रपटप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. प्रत्येकाचा आपला आपला आवडता हिरो असतोच. कुणाचा अभिनय, कुणाचे रुपडे, कुणाची डायलॉग बाजी तर कुणाची झुल्फे, कुणाची बॉडी यावर प्रेक्षक फिदा असतात. पण हे अभिनेते बरेच वेळा अनेक कॉस्मेटीक सर्जरी करून आपले रूप साजरे करून घेत असतात. आज घडीला सुद्धा बॉलीवूड मध्ये जे लोकप्रिय हिरो आहेत त्यातील अनेक प्रत्यक्षात टकलू आहेत याची माहिती बरेचदा आपल्याला नसते. ही यादी लहान नाही बर कां!

यातील काही पूर्ण टकलू आहेत तर बऱ्याच हिरोनी हेअर ट्रान्सप्लांट करून तर काही हिरो विग वापरून आपले रूप प्रेक्षकांसमोर सादर करतात. दबंग खान सलमान स्टाईलिश आणि हँडसम हिरो असला तरी फार पूर्वीच त्याचे केस गेले असून त्याने हेअर ट्रान्सप्लांट करून नवीन केस आणले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन दीर्घ काळ विग वापरत आहेत. त्यांनी सुद्धा केसांसाठी ट्रीटमेंट घेतल्या आहेत.

अगदी सुरवातीला लांब केसांमुळे चर्चेत आलेला मुन्नाभाई उर्फ संजय दत्त यांचे केस करियरच्या सुरवातीलाच गळले आणि त्याने त्याचवेळी हेअर ट्रान्सप्लांट केले आहे. युएसए मध्ये त्याने ही ट्रीटमेंट घेतली होती. एके काळी सुपरहिट सिनेमे देऊन प्रसिद्ध झालेला गोविंदा याला हीच समस्या आहे. वेगवेगळ्या चित्रपटात त्यांचे वेगवेगळे विग दिसले आहेत. त्यानेही नुकतीच दुबईत हेअर ट्रान्सप्लांट केले आहे. नवविवाहित रणबीर कपूर याला सुद्धा कमी वयात केस गळतीला सामोरे जावे लागले असून त्याने २००७ मध्ये केसांसाठी सर्जरी करून घेतली आहे.

आपला सनी देओल फार पूर्वीच पूर्ण टकलू झाला असून त्यानेही हेअर ट्रान्सप्लांट केले आहे तर अक्की उर्फ अक्षयकुमार फिटनेस मध्ये कितीही परफेक्ट असला तरी त्यालाही चाळीशी मध्येच केस गळती झाली असून त्यानेही हेअर ट्रान्सप्लांट केले आहे.