नवी दिल्ली: जीप इंडियाने आपल्या लोकप्रिय एसयूव्ही कंपासच्या किमतीत 35,000 रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांतील या मॉडेलच्या किमतीत झालेली ही दुसरी वाढ आहे. Sport 2.0 डिझेल आवृत्ती वगळता सर्व प्रकारांसाठी कंपासच्या किमती 35,000 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून यूएस-आधारित कार निर्मात्याने आपल्या फ्लॅगशिप SUV वर केलेली ही दुसरी दरवाढ आहे. एप्रिलमध्ये जीप इंडियाने कंपास एसयूव्हीची किंमत 25,000 रुपयांनी वाढवली होती.
Jeep Compass SUV : Jeep India ने वाढवल्या Compass SUV च्या किमती, जाणून घ्या नवीन किमती
इंजिन आणि पॉवर
जीपने पहिल्यांदा भारतात 2017 मध्ये कंपास एसयूव्ही लाँच केली होती. हे सध्या पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. पाच ट्रिममध्ये उपलब्ध, कंपास एसयूव्ही 1.4-लिटर पेट्रोल इंजिन किंवा 2.0-लिटर डिझेल इंजिनसह येते. Trailhawk 4X4 मॉडेल, जे 9-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह डिझेल युनिटशी जोडलेले आहे. ही कार 168 bhp ची कमाल पॉवर आणि 350 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.
किती आहे नवीन किंमत
नवीनतम किंमत वाढीनुसार, जीप कंपास SUV ची एक्स-शोरूम किंमत आता 18.39 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप-स्पेस ट्रेलहॉक प्रकारासाठी 31.32 लाख (एक्स-शोरूम) आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, जीपने कंपास एसयूव्हीचे नाईट ईगल प्रकार देखील लॉन्च केले होते. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये उपलब्ध, कंपासच्या 4X2 नाईट ईगल प्रकाराची किंमत 22.30 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हा प्रकार 2.0-लीटर मल्टीजेट टर्बो डिझेल इंजिनच्या पर्यायासह 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन तसेच 1.4-लिटर मल्टीएअर टर्बो पेट्रोलशी जोडलेल्या 7-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ऑफर केला जातो.
भारतीय बाजारपेठेत, जीप कंपास SUV प्रीमियम SUV सेगमेंटमध्ये स्पर्धा करते, जिथे ती Hyundai Tucson, Citroen C5 Aircross, Skoda Kodiaq आणि Volkswagen Tiguan सारख्या कारशी स्पर्धा करते.