राज्यसभा निवडणुकीतच झाला असता संजय राऊतांचा खेळ खल्लास, शिंदे गटाने बनवला होता ‘टूथपेस्ट’चा फॉर्म्युला


मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार राज्यसभा निवडणुकीपूर्वीच बंडखोरीच्या तयारीत होते. राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांचा पराभव करण्याचा फॉर्म्युला त्यांनी तयार केला. मात्र, त्याचा लाभ मिळू शकला नाही. शिंदे गटामधील एक आमदार चर्चगेट स्थानकासमोरील एशियन डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेला होता. त्याने दहा लहान टूथपेस्ट विकत घेतल्या.

या दहा टूथपेस्टच्या माध्यमातून दहा आमदारांची मते अवैध ठरविण्याचा प्रयत्न करण्याचा डाव आखण्यात आला. त्यासाठी त्याने बोटावर थोडी टूथपेस्ट लावली. मतपेटीमध्ये थोडी पेस्ट टाकण्याची रणनीती होती, जेणेकरून मत अस्पष्ट किंवा खोडून टाकले जाईल आणि अवैध घोषित केले जाईल.

ठाकरेंमुळे बदलली आमदारांनी रणनीती
मात्र, नंतर रणनीती बदलण्यात आली. संजय राऊत यांचा अपमान करण्याचा आमचा हेतू नाही, असे बंडखोर आमदारांनी सांगितले. असे केले तर उद्धव ठाकरे सावध राहतील.

शिंदे गटाला संजय राऊत नापसंत
शिंदे गटाचे आमदार उद्धव ठाकरेंबद्दल आदर असल्याबद्दल सतत बोलत असले, तरी ते संजय राऊत यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. त्यांनी राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे एजंट म्हणूनही घोषित केले आहे. संजय राऊत राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. शिवसेना हिंदुत्वाच्या विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोपही आमदारांनी केला.