कोरोना प्रकरणांमध्ये वाढ, काल दिवसभरात 18,815 नव्या बाधितांची नोंद, तर 38 मृत्यू


नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतच्या मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 18,815 नवीन रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 38 जणांचा मृत्यू झाला. दैनंदिन संसर्गाचे प्रमाण पाच टक्क्यांच्या जवळपास वाढले आहे.

शुक्रवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,22,335 वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांसह, देशातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता 4,35,85,554 झाली आहे. त्याचप्रमाणे, आणखी 38 मृत्यूंसह एकूण मृतांची संख्या 5,25,343 वर पोहोचली आहे.

एकूण संक्रमितांपैकी 0.28 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर कोविडमधून बरे होण्याचे प्रमाण 98.51 टक्के आहे. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांची संख्या 2,878 ने वाढली आहे. दैनंदिन संसर्ग दर 4.96 टक्के वाढला, तर साप्ताहिक संसर्ग दर 4.09 टक्के होता. या महामारीतून आतापर्यंत 4,29,37,876 रुग्ण बरे झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. देशात कोरोना महामारीविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत कोविड लसीचे 198.51 कोटी डोस देण्यात आले आहेत.