व्हीडोओ गेम्स खेळण्याचे असे आहेत फायदे

आज ८ जुलै हा जागतिक व्हिडीओ गेम दिवस म्हणून साजरा होतो. आपला नेहमीचा समज व्हिडीओ गेम खेळणे म्हणजे वेळेची बरबादी, डोळ्यांचे नुकसान आणि व्हिडीओ गेमचे व्यसन लागण्याची भीती असा आहे. मात्र नित्य होत असलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की अगदी मोजक्या प्रमाणात व्हिडीओ गेम्स खेळले गेले तर त्याचे अनेक फायदेही आहेत.

यात काही गेम्स असे आहेत ज्यात फिजिकल मुव्हमेंट वाढण्यास मदत होते. त्यामुळे खेळणारा अॅक्टीव्ह राहतो कारण या गेम मध्ये मोशन सेन्सर असतात जे धावपळ, व्हर्च्युअल टेनिस, फुटबॉल, स्केटबोर्ड असे खेळ असतात. जे खेळाडू आठवड्यात ३ तासापेक्षा जास्त वेळ खेळतात त्यांच्या चिकित्सा प्रक्रियेत चुका होण्याची शक्यता ३२ टक्के कमी होते असे म्हटले जाते.

डीस्लेक्सिया चे रुग्ण असलेल्यांची कॉन्स्ट्रेशन समस्या व्हिडीओ गेम खेळल्याने दूर होण्यास मदत होते. कलर ब्लाईडनेस असलेल्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. आठवड्यात १० तास बौद्धिक खेळ खेळणाऱ्या ५० पेक्षा अधिक वयाच्या लोकांचे मानसिक आरोग्य चांगले राहते, मेंदू अधिक चांगले काम करतो. दुखणी, वेदनावरील लक्ष कमी होते आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता वाढते असेही दिसून आले आहे. वारंवार खाणे, धुम्रपान, मद्य घेण्याची सवय कमी होण्यासाठी सुद्धा व्हिडीओ गेम्स उपयुक्त ठरतात.

जेव्हा खेळणारा खेळाडू त्या खेळांचा आनंद घेतो तेव्हा त्याच्यावरचा स्ट्रेस कमी होतो. अनेक व्हीडीओ गेम्स टीम सह खेळायचे असतात आणि त्यात टीम ला वाचविणे हे तुमचे काम असते. अश्या खेळांमुळे नेतृत्व गुण विकसित होतात आणि त्याचा प्रत्यक्ष आयुष्यात आत्मविश्वास वाढण्यास फायदा मिळतो असे ही दिसून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही