बोरिस, पंतप्रधानपद सोडल्यावरही म्हणून देताहेत जंगी पार्टी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी अखेर त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र ऑक्टोबर मध्ये नवे पंतप्रधान निवडले जाईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहेत. दरम्यान बोरिस जोन्सन एक शानदार पार्टी देत असून त्यासाठी परिवार आणि निकटच्या मित्रमंडळीना आमंत्रणे केली गेली आहेत असे समजते. बोरिस ही पार्टी अनेक ब्रिटीश पंतप्रधान जेथे पाहुण्यांचे स्वागत करत असत आणि जेथे जगातील अनेक नेत्यांशी भेटीगाठी केल्या जातात त्या ‘चेकर्स’ या घरामध्ये मध्ये देणार आहेत. १९२० पासून ‘चेकर्स’ या कारणांसाठी नेहमी चर्चेत राहिले आहे. या घरात १० रूम्स आणि आर्ट गॅलरी आहे.

द मिररने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार बोरिस ३० जुलै रोजी येथे वेडिंग पार्टी देणार आहेत. गतवर्षी त्यांनी ३४ वर्षीय गर्लफ्रेंड कॅरी यांच्यासोबत विवाह केला आहे. मात्र त्यावेळी करोना असल्याने हा विवाह अगदी साधेपणाने आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा केला गेला होता. आता याच निमित्ताने दिल्या जात असलेल्या पार्टी मुळे बोरिस उत्साहात आहेत.

पंतप्रधानपदाचा राजीनामा देताना बोरिस जोन्सन यांनी लोकांच्या इछेचा सन्मान करून राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे आणि त्याच वेळी पद सोडताना दुःख होत असल्याचेही म्हटले आहे. त्यानंतर घेतलेल्या कॅबिनेट मिटिंग मध्ये त्यांनी आपण कोणत्याही नव्या योजनेवर मोठा निर्णय घेणार नाही असे जाहीर केले आहे. पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये माजी अर्थमंत्री ऋषी सुनक आघाडीवर आहेत तसेच फॉरेन कॉमन वेल्थ अँड डेव्हलपममेंट अफेअर्सच्या सेक्रेटरी लीज ट्रस यांचेही नाव चर्चेत आहे.