रियलमी जीटी निओ३- थॉर, लव अँड थंडर, खास एडिशन लाँच

रियलमीने मार्व्हल स्टुडीओ सह जीटी निओ ३, १५० डब्ल्यू स्पेशल एडिशन स्मार्टफोन लाँच केला असून त्याची प्रेरणा आणि डिझाईन ‘थॉर, लव अँड थंडर’ या चित्रपटावरून घेतले आहे. भारतात हा फोन ४२९९९ रुपयात मिळणार आहे. १२ जीबी रॅम नी २५६ जीबी स्टोरेज सह चित्रपटाच्या रिलीज उत्सवांतर्गत हा फोन सादर केला गेला आहे. याच फोनचे पहिले व्हेरीयंट वर्षाच्या सुरवातीला भारतात ३६९९९ रुपयात सादर केले गेले आहे. प्री ऑर्डर केल्यास या फोनवर ३ हजार रुपये डिस्काऊंट मिळणार आहे.

हा फोन नवीन नायट्रो ब्ल्यू कलर व्हेरीयंट मध्ये आहे. फिल्म कॅरेक्टर नुसार हा कलर आहे. १३ जुलै पासून हा फोन फ्लिपकार्ट, रियलमी डॉट कॉम आणि रियलमी मेन लाईन स्टोअर्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. नव्या एडिशन मध्ये रीफ्रेशड्ड कलर, डिझाईन व १५० वॉट चार्जर दिला गेला आहे.

या फोनसाठी ६.७ इंची फुल एचडी डिस्प्ले, गोरील्ला ग्लास ५ प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट असून प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा, ८ एमपीचे अल्ट्रा वाईड व २ एमपीचे मायक्रो सेन्सर आहेत. फ्रंटला सेल्फी साठी १६ एमपीचा कॅमेरा आहे. फोनसाठी ५ हजार एमएएचची बॅटरी दिली गेली आहे.