कर्नाटकातील केरूरमध्ये दोन गटात हिंसाचार, शाळा-महाविद्यालयांना सुटी; कलम 144 लागू


बागलकोट – कर्नाटकातील केरूर, बागलकोटमध्ये बुधवारी सायंकाळी दोन गटात हाणामारी होऊन हिंसाचार उसळला. तीन जण जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शुक्रवारपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दोन गटातील वादानंतर हा हिंसाचार सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. विविध समाजाचे लोक समोरासमोर आले. जाळपोळही झाली. केरूरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

बागलकोटचे जिल्हाधिकारी सुनील कुमार यांनी सांगितले की, 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर काही वेळातच अज्ञातांनी मार्केटमध्ये घुसून वाहनांची जाळपोळ केली. महिलांच्या विनयभंगाबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचे सांगण्यात आले. यावरून वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.