१४ जुलैला येताहेत सॅमसंग गॅलेक्सी एम १३ सिरीजचे स्मार्टफोन
सॅमसंग त्यांच्या गॅलेक्सी एम १३ सिरीजचे स्मार्टफोन भारतात १४ जुलै रोजी सादर करत असल्याची घोषणा केली गेली आहे. एम १३ फोर जी आणि एम १३ फाईव्ह जी च्या या स्मार्टफोन्सची काही फीचर्स कंपनीने जाहीर केली आहेत. त्यानुसार एम १३ फोर जीला पहिल्याप्रमाणेच रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार असून त्यातील प्रायमरी कॅमेरा ५० एमपीचा असेल. ५ एमपीचे अल्ट्रावाईड आणि २ एमपीचे डेप्थ सेन्सर असतील. या फोन साठी ६ हजार एमएएचची बॅटरी १५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाणार आहे. ग्रीन आणि गडद निळा अश्या दोन रंगात हा फोन येईल.
एम १३ फाईव्ह जी साठी ड्युअल कॅमेरा सेट अप दिला जाणार असून ५ हजार एमएएचची बॅटरी १५ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाणार आहे. या फोन साठी ११ फाईव्ह जी बँड सपोर्ट दिला जाईल. हे दोन्ही फोन १२ जीबी रॅम (फिजिकल आणि रॅम प्लस कॉम्बिनेशन- यालाच व्हर्च्युअल रॅम असेही म्हणतात.) सह येतील. फोर जी साठी ६.६ इंची आयपीएस एलसीडी फुल एच डी प्लस डिस्प्ले असेल तर एम १३ फाईव्ह जी साठी ६.५ इंची एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. दोन्ही फोन ४/६ जीबी रॅम आणि १२८ स्टोरेज सह असतील.
या दोन्ही फोनच्या किंमती भारतात १५ हजारापेक्षा कमी असतील असे सांगितले जात आहे.