कोविड प्रकरण आणि संसर्गाचे प्रमाण वाढले, काल दिवसभरात 28 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चढ-उताराचा ट्रेंड सुरूच आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नवीन रुग्ण आणि संसर्गाचे प्रमाण वाढले.

बुधवारी सकाळी 8 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 16,159 नवीन कोरोनाबाधित आढळले, तर 28 लोकांचा मृत्यू झाला. दैनंदिन संसर्ग दर 3.56 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय प्रकरणे 1,15,212 पर्यंत वाढली आहेत.

मंगळवारी, देशात 13,085 नवीन संक्रमित आढळले, तर सोमवारी 16,135, रविवारी 16,103 आणि शनिवारी 17,092 आणि शुक्रवारी 17,070 आढळले. यावरून कोरोनाचे नवीन रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.