वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या एकदिवसीय मालिकेत संघाचे दोन्ही वरिष्ठ खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत शिखर धवन नेतृत्व करेल, तर अष्टपैलू रवींद्र जडेजाला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विराट आणि रोहितशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या मालिकेत खेळणार नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, धवनकडे कर्णधारपद, दिग्गजांना विश्रांती
भारतीय संघ : शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल , आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.