Bhagwant Mann Marriage : भगवंत मान यांना का व्हावे लागले पहिल्या पत्नीपासून वेगळे? आता कुटुंब कुठे राहते, जाणून घ्या सर्व काही माहिती


चंदीगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत. गुरुवारी ते चंदीगडमध्ये डॉ. गुरप्रीत कौरसोबत लग्न करणार आहेत. त्यांच्या निवासस्थानी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भगवंत मान यांनी पहिले लग्न इंद्रप्रीत कौरशी केले होते. आता त्या त्यांच्या दोन मुलांसह अमेरिकेत राहतात. चला जाणून घेऊया सीएम भगवंत मान यांना घटस्फोट का घ्यावा लागला त्याचे कारण.

शहीद भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकरकालनमध्ये भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा या दोन्ही चेहऱ्यांची जोरदार चर्चा रंगली होती. हे दोन चेहरे भागवत मान यांचे पुत्र आणि मुलगी होते. शपथविधी सोहळ्यासाठी दोघेही अमेरिकेहून आले होते. दोघेही वडील भगवंत मान यांच्यासोबत सात वर्षांनी भेटले होते.

भगवंत मान यांचा मुलगा दिलशान मान 17 वर्षांचा आणि मुलगी सीरत कौर मान 21 वर्षांची आहे. दोघेही त्यांची आई इंद्रप्रीत कौरसोबत अमेरिकेत राहतात. भगवंत मान आणि इंद्रप्रीत कौर यांचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. तेव्हापासून इंद्रप्रीत कौर आपल्या दोन मुलांसह अमेरिकेत राहते. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भागवत मान आम आदमी पक्षाच्या तिकिटावर संगरूरमधून विजयी झाले होते.

जेव्हा भगवंत मान यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीनेही त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघात अनेक सभा घेतल्या. निवडणूक प्रचारादरम्यान इंद्रप्रीतच्या प्रभावी भाषणांची खूप चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने इंद्रप्रीतला तिकीट दिल्यास ती सहज जिंकू शकते, असेही त्यावेळी म्हटले होते.

खासदार झाल्यानंतर एक वर्षानंतर दाखल केली घटस्फोटाची याचिका
20 मार्च 2015 रोजी भगवंत मान आणि इंद्रप्रीत कौर यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जात मान यांचा युक्तिवाद होता की, राजकारणामुळे ते पत्नीपासून घटस्फोट घेत आहेत. लोकांनी त्यांना विश्वासाने निवडून दिले आहे. वृत्तानुसार, कोर्टात दिलेल्या अर्जात भगवंत मान यांच्या पत्नीने अट घातली होती की, जर मान भारत सोडून कॅलिफोर्नियाला गेले, तर घटस्फोटाचा अर्ज मागे घेईन. दुसरीकडे, मान यांना राजकारण सोडून परदेशात जायचे नव्हते. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नव्हता, असा मान यांचा युक्तिवाद होता. जर त्यांच्या पत्नीला त्यांच्यासोबत भारतात स्थायिक व्हायचे, असेल तर ते घटस्फोटाचा अर्ज मागे घेतील.

भगवंत मान यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर घटस्फोटाचे कारणही शेअर केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, जे काही काळापासून लटकत होते, ते दूर झाले, न्यायालयाचा निर्णय, तो काल बनला, एक पास परिवार, दुजे पास सी पंजाब, मैं तो यारो अपने पंजाब वॉल हो गए. भगवंत मान यांचा राजकारणातील पत वाढली आहे. 2019 मध्ये मान दुसऱ्यांदा लोकसभेचे खासदार झाले. आता पंजाबचे 25 वे मुख्यमंत्री झाले आहेत. यानंतरही कुटुंबाच्या वियोगाची वेदना त्यांच्या हृदयात आहे. एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले होते की, राजकारणामुळे मी माझी मुले आणि कुटुंब गमावले. ते आता अमेरिकेचे नागरिक आहेत.