आयफोन १४ च्या कस्टम व्हेरीयंट साठी मोजावे लागतील २० लाख रुपये
अॅपल, आयफोन १४ सिरीज यावर्षी सादर करणार असून त्यात आयफोन १४, मॅक्स, प्रो आणि प्रो मॅक्स अशी चार व्हेरीयंट सादर होतील. त्यासाठी प्री ऑर्डरची सुरवात लवकरच होईल. दरम्यान कस्टम आयफोन निर्माते कॅवीयर ग्लोबल यांनी १४ सिरीज साठीचे प्रीबुकिंग सुरु केले आहे. कॅव्हिअर ग्लोबल ही लोकप्रिय कस्टम आयफोन निर्माती कंपनी असून हाय एंड कस्टम डिझाईन बनविते. कंपनीने प्री बुकिंग घेताना जे युजर वेबसाईटवर डिव्हाईस प्री बुक करतील ते डिलिव्हरी मिळणारे पहिले ग्राहक असतील अशी खात्री दिली आहे.
अर्थात प्री बुकिंग करताना आयफोनची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. कॅव्हिअर ग्लोबल प्रीमियम डिव्हायसेस बनवितात. आयफोन १४ च्या शँपेन रोझ व्हर्जनची सुरवातीची किंमत ९५२० डॉलर्स म्हणजे ७,५५,४३० रुपये आहे. तर गोल्ड शँपेन क्रिस्टल व्हेरीयंटची किंमत २४९५० डॉलर्स म्हणजे चक्क १९,७९,५३० रुपये आहे. फोन मध्ये १८ कॅरेट गोल्ड, गोल्डन स्टिंगरे, टायटेनीम आणि डायमंड्सचा वापर केला जातो. त्यात टायटेनियम ज्वेलरी रेझिन वापरून कॅव्हिअर लोगो बनविला जातो.
या फोन्सच्या किमती मॉडेल प्रमाणे आणि तुम्ही किती स्टोरेजचा फोन निवडता त्यावर ठरतात. प्रत्येक व्हेरीयंटची फक्त ९९ युनिट बनविली जातात असे सांगितले जाते.