Kaali: लीनापूर्वी देवदेवतांवर चित्रपट बनवून फसले होते हे दिग्दर्शक, अशा प्रकारे झाली वादातून सुटका


‘काली’ हा चित्रपट सध्या त्याच्या आक्षेपार्ह पोस्टरमुळे वादात सापडला आहे. या माहितीपटाच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री मां कालीच्या अवतारात सिगारेट ओढताना आणि दुसऱ्या हातात एलजीबीटीक्यू ध्वज धरलेला दिसत आहे, ज्यामुळे चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मनिमेकलाई यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लीनाविरुद्ध उत्तर प्रदेश आणि दिल्लीत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. मात्र, एखादा दिग्दर्शक त्याच्या चित्रपटामुळे वादात सापडण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक दिग्दर्शकांवर चित्रपटांच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. चला तुम्हाला त्या चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या दिग्दर्शकांबद्दल आम्ही आज सांगणार आहोत.

ब्रह्मास्त्र
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा 2022 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जो 9 सप्टेंबर रोजी पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही काळापूर्वी समोर आला होता, ज्यामध्ये रणबीर कपूर बूट घालून मंदिराची घंटा वाजवताना दिसला होता, ज्यामुळे चित्रपटावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर ट्विटरवर ‘बॉयकॉट ब्रह्मास्त्र’ ट्रेंड होऊ लागला, त्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जीला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. अयानने सांगितले होते की, चित्रपटात रणबीर मंदिरात नाही, तर दुर्गा पूजा मंडपामध्ये प्रवेश करत आहे.

लक्ष्मीबॉम्ब
अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीचा 2020मध्ये ओटीटीवर रिलीज झालेला लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट देखील वादात सापडला होता. सुरुवातीला या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाचे शीर्षक बदलण्यात आले. तसेच हा चित्रपट लव्ह जिहादचे समर्थन करत असल्याचे काहीजणांनी म्हटले होते.

पीके
2018 मध्ये रिलीज झालेल्या ‘पीके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती, मात्र रिलीजपूर्वी या चित्रपटालाही अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटात अशी अनेक दृश्ये होती, ज्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता आमिर खान यांच्यावर जोरदार टीका झाली होती. या चित्रपटात धर्मातील काही प्रथा अंधश्रद्धा म्हणून दाखवण्यात आल्या होत्या. मात्र, हळूहळू या चित्रपटाशी संबंधित वाद शांत झाला.

पद्मावत
या यादीत ‘पद्मावत’ चित्रपटाचाही समावेश असून, रिलीजपूर्वीच देशभरात प्रचंड गदारोळ झाला होता. चित्रपटाची कथा चित्तोडची राणी पद्मावतीवर आधारित असून संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली होती. या चित्रपटातून राणी पद्मावतीची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. अशा परिस्थितीत लोकांनी संजय लीला भन्साळी आणि चित्रपटाची अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचवेळी या गदारोळातून बाहेर पडण्यासाठी चित्रपटाचे नाव बदलण्यात आले. सुरुवातीला चित्रपटाचे नाव ‘पद्मावती’ होते, ते बदलून ‘पद्मावत’ करण्यात आले.


संजय लीला भन्साळी दिग्दर्शित रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचा चित्रपटही वादात अडकण्यापासून वाचू शकला नाही. चित्रपटाच्या नावावरून बराच गदारोळ झाला होता. चित्रपटाच्या नावाची घोषणा करताना त्याला ‘राम लीला’ असे शीर्षक देण्यात आले. तर दुसरीकडे दोन समाजातील वादही या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत धार्मिक भावना दुखावण्याबरोबरच या चित्रपटावर जातीय हिंसाचाराचाही आरोप करण्यात आला. चित्रपट रिलीज होण्याच्या काही काळापूर्वी त्याचे नाव बदलून ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ असे करण्यात आले.

OMG (ओह माय गॉड)
2012 मध्ये आलेल्या ‘ओएमजी – ओह माय गॉड’ या चित्रपटात हिंदू धर्म दाखवण्यात आला होता. चित्रपटात अनेक चांगल्या-वाईट गोष्टींवर चर्चा करण्यात आली होती, मात्र धर्मावर बनलेल्या या चित्रपटावरून वादही निर्माण झाला होता. उमेश शुक्ला दिग्दर्शित या चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकंच नाही तर स्टारकास्टविरोधातही तक्रार दाखल करण्यात आली होती. यूएईमध्येही या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, हळूहळू या चित्रपटाशी संबंधित वादही शांत झाला.