कुल्लू – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अनेक जण जखमीही झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
Road Accident : हिमाचलच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात, खोल दरीत कोसळली बस, 12 जणांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील शैनशार येथे एका खासगी बसला अपघात झाला आहे. या अपघातात डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जंगला गावापासून सुमारे 200 मीटर अंतरावर बस दरीत कोसळली आहे. या अपघातात शाळकरी मुलेही बळी गेल्याची माहिती आहे. बसमध्ये मृतदेह अडकले आहेत.
सोमवारी सकाळी 8.45 च्या सुमारास हा अपघात झाला. बस शंशारहून औटकडे जात होती. कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, बस अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.