दैनंदिन संसर्ग दर 4.85 टक्क्यांपर्यंत वाढला, काल दिवसभरात 16 हजारांहून अधिक नवीन बाधितांची नोंद


नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले असून 24 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर दैनंदिन संसर्ग दर 4.85 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सोमवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्ययावत केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 16,135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या दरम्यान 13,958 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,13,864 झाली आहे. गेल्या 24 तासात 2153 ची वाढ झाली आहे.

सोमवारी आढळून आलेली नवीन प्रकरणे रविवारच्या तुलनेत किरकोळ जास्त आहेत. रविवारी 16,103 नवीन रुग्ण आढळले होते, तर आज 16,135 नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी, शनिवारी 17,092 आणि शुक्रवारी 17,070 प्रकरणे नोंदवली गेली होती.

देशातील कोरोना एका नजरेत

  • सोमवारी 16,135 नवीन बाधित आढळले
  • एकूण संक्रमितांची संख्या 4,35,18,564
  • 1,13,864 चालू सक्रिय प्रकरणे, 24 तासांत 2153 वाढ
  • एकूण मृतांची संख्या 5,25,223, 24 तासांत 24 मृत्यू
  • एकूण संक्रमितांपैकी 0.26 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत
  • कोरोना रिकव्हरी रेट 98.54% आहे
  • रविवारी 3,32,978 नमुने तपासण्यात आले
  • आतापर्यंत एकूण 86,39,99,907 नमुने तपासण्यात आले आहेत