मद्य आणि धुम्रपानापासून हे खेळाडू आहेत चार कोस लांब
टीम इंडिया मध्ये नेहमीच पार्ट्या होतात आणि पार्टी मध्ये ड्रिंक्स घेण्याची प्रथा जुनीच आहे. अनेक खेळाडूना ड्रिंक घेणे आवडते सुद्धा. पण टीम इंडिया मध्ये असेही काही खेळाडू आहेत जे धुम्रपान आणि मद्यप्राशनापासून चार कोस लांब आहेत म्हणजे त्यांनी मद्याला कधी स्पर्श केलेला नाही आणि सिगरेट हातात धरलेली नाही.
कोण आहेत हे चार खेळाडू याचे अनेकांना कुतूहल असेल. त्यातील एक आहे टीम इंडियाचा कोच आणि माजी कप्तान राहुल द्रविड. ‘वॉल’ या नावाने टीम मध्ये प्रसिद्ध असलेला राहुल एक यशस्वी कप्तान म्हणून ओळखला जातो. १६४ टेस्ट, ३४४ वनडे असे भरभक्कम रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. जेंटलमन अशीच त्याची प्रतिमा असून त्याने आजपर्यंत कधीच मद्यपान केलेले नाही अथवा धुम्रपान केलेले नाही. स्टारसन फोल्डेड. कॉम साईटवर ही माहिती दिली गेली आहे.
या यादीतील दुसरा खेळाडू आहे भुवनेश्वर कुमार. टीम इंडियाचा हा वेगवान गोलंदाज सध्या टीम साठी खूप महत्वाचा खेळाडू आहे. २१ कसोटी, १२१ वनडे आणि ६६ टी २० इतके सामने तो आत्तापर्यंत खेळला आहे आणि स्वच्छ प्रतिमेचा खेळाडू अशी त्याची प्रतिमा आहे. त्याने टीम इंडियाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यानेही कधी धुम्रपान किंवा मद्यप्राशन केलेले नाही.
टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आता भाजपचा खासदार गौतम गंभीर हा सुद्धा धुम्रपान आणि ड्रिंक्स पासून दूर आहे. मात्र एकदा त्याने दारूची जाहिरात केली होती. ५८ कसोटी, १४७ वनडे आणि ३७ टी २० सामने तो भारतासाठी खेळला आहे. परवेझ रसूल हा जम्मू काश्मीर स्थानिक क्रिकेट मधील नामवंत खेळाडू. टीम इंडिया कडून तो आत्ता पर्यंत फक्त १ वनडे आणि एक टी २० खेळला आहे मात्र स्थानिक क्रिकेट मध्ये तो सर्वश्रेष्ठ ऑलराउंडर म्हणून ओळखला जातो. फर्स्टक्लास क्रिकेट मध्ये त्याने ८२ सामने आणि २६६ विकेट घेतल्या आहेत. परवेझ सुद्धा मद्य आणि सिगरेट पासून कायम दूर राहिला आहे.