अमेरिकेत प्रवाशांचा महापूर- विमानतळांवर प्रचंड गर्दी

अमेरिकेच्या स्वतंत्रदिवसाच्या सुट्टीच्या निमित्ताने गेली दोन वर्षे घरात बंदी झालेले अमेरिकन मोठ्या प्रमाणावर प्रवासासाठी बाहेर पडले आहेत. यामुळे विमानतळांवर रविवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे सुमारे १० हजार फ्लाईटस लेट झाल्या तर १ हजार फ्लाईटस रद्द झाल्या. गेली दोन वर्षे घरात राहिलेले अमेरिकन आता समुद्र किनारे, ऐतिहासिक स्थळे, जवळचे नातेवाईक यांना भेटी देण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. या आठवड्यात पूर्ण अमेरिकेत किमान सव्वा कोटी नागरिक विमान प्रवास करतील असा अंदाज असून एकट्या शुक्रवारी २५ लाख नागरिकांनी विमान प्रवास केला आहे.

ट्रॅव्हल अॅप हॉपरच्या रिपोर्ट नुसार विमान भाडे गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत खूपच महाग आहे तरीही प्रवासी प्रंचड गर्दी करत आहेत. अमेरिकेचा स्वातंत्रदिन ४ जुलै रोजी साजरा होतो आणि या निमित्ताने सुट्ट्या दिल्या जातात.१७७६ साली ब्रिटन पासून अमेरिका स्वतंत्र झाली. या निमित्ताने परेड, बार्बेक्यूचे आयोजन केले जाते. नागरिक लाल, निळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालतात आणि आतषबाजी मोठ्या प्रमाणावर केली जाते.

अमेरिका ब्रिटीशांचे गुलाम होते आणि येथेही ब्रिटिशानी खूप अत्याचार केले होते. त्यामुळे येथील लोकांनी दीर्घ संघर्ष केला आणि अखेर २ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ पैकी १२ वसाहतींनी स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. अखेर ४ जुलै रोजी सर्व १३ वसाहती स्वतंत्र घोषित केल्या गेल्या आणि मतदान घेतले गेले. ही घटना डिक्लरेशन ऑफ इनडिपेंडंन्स म्हणून ओळखली जाते. जनरल जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले आणि त्यांच्याच नावावरून राजधानीला वॉशिंग्टन नाव दिले गेले असे अमेरिकेचा इतिहास सांगतो.