पालनपूर – उदयपूर हत्याकांडाच्या निषेधार्थ गुजरातमधील बनासकांठा येथील वाघासन ग्रुप ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर 30 जून रोजी मुस्लिम फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी करू नयेत, असा आदेश दुकानदारांना जारी करण्यात आला आहे. शेजारच्या राजस्थान राज्यात झालेल्या निर्घृण हत्येचा निषेध करणे हा गावकऱ्यांचा उद्देश असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.
Gujarat : उदयपूर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांकडून वस्तू खरेदी न करण्याचे पंचायतीचे फर्मान
वाघासन ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सरपंच माफीबेन पटेल यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आल्याचे बनासकांठा जिल्हा विकास अधिकारी स्वप्नील खरे यांनी सांगितले. मात्र, त्यांना तसे करण्याचा अधिकार नाही.
गाव सध्या प्रशासनाच्या अखत्यारीत असून सरपंचपदासाठी निवडणूक होणार आहे. हे पत्र निराधार असून कोणीही त्याचे पालन करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.