नवी दिल्ली – देशात गेल्या 24 तासांत 16,103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे, तर यादरम्यान 31 रुग्णांचा मृत्यू झाला. एक दिवस आधी म्हणजेच शनिवारी 17,092 नवीन रुग्ण आढळले, तर शुक्रवारी 17,070 रुग्ण आढळले.
Covid Cases in India : काल दिवसभरात 16,103 कोरोनाबाधितांची नोंद, 31 जणांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,11,711 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, दैनिक संसर्ग दर 4.27 वर पोहोचला आहे. शनिवारी दैनंदिन संसर्ग दर 4.14 टक्के नोंदवला गेला. रविवारी त्यात वाढ नोंदवण्यात आली. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 2143 ने वाढ झाली आहे. 24 तासांत आणखी 31 मृत्यू झाल्याने देशातील एकूण मृतांची संख्या 5,25,199 वर पोहोचली आहे.