२०२० नंतर प्रथमच शी जिनपिंग चीन बाहेर

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच देशाबाहेर पडले आहेत. हॉंगकॉंग येथे एका खास समारंभांसाठी शी जिनपिंग आले आहेत. हॉंगकॉंग ब्रिटीशांच्या तावडीतून चीनला सोपविले गेले त्याला यावर्षी २५ वर्षे होत आहेत. १ जुलै १९९७ रोजी ब्रिटनने हॉंगकॉंग चीनला सोपविले होते. त्यामुळे हस्तांतरणांला २५ वर्षे पूर्ण होत असून त्यानिम्मित आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शी जिनपिंग येथे आले आहेत.

करोनाची सुरवात चीन पासून झाली आणि जगभर या साथीने अक्षरशः रणकंदन केले. याचा सर्वाधिक फटका चीन आणि अमेरिकेला बसला. चीन ने गेली दोन वर्षे परदेशी लोकांसाठी देशाच्या सीमा बंद केल्या आणि आजही अनेक शहरात लॉकडाऊन लावले जात आहेत. हॉंगकॉंग पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शी जिनपिंग यांच्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त केला गेले आहे. कार्यक्रम स्थळाच्या आसपासचे सर्व रस्ते बंद केले गेले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीनंतर जिनपिंग प्रथमच मोठ्या कार्यक्रमात हजेरी लावत आहेत.

ब्रिक्स २०२२ संमेलनात जिनपिंग डिजिटली सहभागी झाले होते. मिडिया रिपोर्ट नुसार शी जिनपिंग सेरेब्रल एन्युरीझम या विकाराने आजारी आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये याच आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांना सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला गेला होता मात्र त्यांनी औषधोपचार घेण्यास प्राधान्य दिले आहे. २०१९ मध्ये ते इटली ला गेले होते तेव्हाही त्यांना चालताना, बसताना आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे शी जिनपिंग याच्या तब्येतीविषयी चर्चा सुरु झाल्या होत्या.