मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आज (1 जुलै) दुपारी 12 वाजता अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर होणार आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली. तसेच शिवसैनिकांना आवाहन केले. 2007 च्या जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले असून त्यांना 1 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार संजय राऊत, शिवसैनिकांना केले मोठे आवाहन
राऊत यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली
स्वत: संजय राऊत यांनी ईडीसमोर हजर होण्याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, ‘मी आज दुपारी 12 वाजता तपास यंत्रणा ईडीच्या कार्यालयात जाईन. मी समन्सचा आदर करतो आणि तपास यंत्रणांना मदत करणे, हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करु नये.