Pushpa The Rule : ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुनसोबत तुम्ही देखील शेअर करु शकता स्क्रिन, जाणून घ्या काय आहे त्याची प्रक्रिया


अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा : भाग २’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! वृत्तांवर विश्वास ठेवला तर पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे काम सुरू झाले आहे. होय, एकीकडे प्रशांत नीलच्या ‘KGF: Chapter 2’ च्या यशानंतर सुकुमार ‘पुष्पा: द रुल’च्या स्क्रिप्टवर पुन्हा काम करत आहे. दुसरीकडे, निर्मात्यांनी यासाठी नव्या चेहऱ्यांचा शोध सुरू केला आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील विविध पात्रांसाठी ऑडिशन्स सुरू केल्या आहेत. म्हणजेच, आता तुम्ही अल्लू अर्जुनसोबत ‘पुष्पा 2’मध्येही तुमचा परफॉर्मन्स दाखवू शकता. जाणून घ्या काय आहे त्याची पद्धत….

अशा प्रकारे बनू शकता पुष्पा 2 चा भाग
निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट शेअर केली आणि माहिती दिली की पुष्पा भाग 2 साठी ऑडिशन फेरी 3 जुलैपासून सुरू होईल. निर्मात्यांनी लिहिले, “पुष्पा: द रुलसाठी ऑडिशन 3 जुलै ते 5 जुलै दरम्यान तिरुपती येथील शाळेत होणार आहेत. महिला, मुले आणि पुरुष, ज्यांना इच्छुक असेल त्यांनी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत ऑडिशनसाठी येऊ शकता. मात्र, निर्मात्यांनी एक अटही घातली आहे.

निर्मात्यांनी शेअर केलेल्या पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, ज्यांना चित्तोडची भाषा बोलता येते तेच यासाठी अर्ज करू शकतात. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

पुष्पाचा दुसरा भाग कधी येणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनचा चित्रपट आता ऑगस्टपर्यंत फ्लोरवर जाईल. या 6 महिन्यांपेक्षा जास्त वेळापत्रकात अनेक अॅक्शन सीक्वेन्स शूट केले जातील. असे म्हटले जात आहे की हे अॅक्शन सीन्स भारतीय सिनेमातील आतापर्यंतच्या सर्वात महागड्या सीन्सपैकी एक असतील. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम केले जाईल. म्हणजेच हा चित्रपट आता 2023 च्या मध्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.