रिलायंस रिटेल फूड बेवरेज क्षेत्रात धमाका करण्यास तयार

रिलायंस उद्योगसमूहातील रिलायंस रिटेल देशात फूड आणि बेवरेज रिटेल क्षेत्रात मोठा धमाका करण्याच्या तयारीला लागली असून कंपनीने प्रसिद्ध जागतिक फूड चेन ब्रांड प्रेट ए मांगर( Pret A manger) ब्रांड सह धोरणात्मक भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. हा ब्रांड भारतीय बाजारात मजबूत बनविण्यासाठी दोन्ही कंपन्या एकत्र काम करणार आहेत. जगभरात Pret A manger ही चेन ताजे रेडी टू इट खाद्यपदार्थ आणि ऑर्गेनिक कॉफी साठी प्रसिद्ध आहे.

Pret A manger हा फ्रेंच भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ रेडी टू ईट असा आहे. रिलायंस रिटेल व्हेन्चर लिमिटेड ची सहयोगी कंपनी रिलायंस ब्रान्डस लिमिटेड ने Pret A manger बरोबर करार केला असून रिलायंस ब्रांडस देशातील प्रमुख शहरात फूड चेन सुरु करत आहे. Pret A mangerचे पहिले दुकान १९८६ मध्ये लंडन येथे सुरु झाले होते. हाताने बनविलेले ताजे रेडी टू ईट पदार्थ येथे मिळतात. युके, युएस, युरोप आणि आशियातील ९ देशात या ब्रांडची ५५० दुकाने आहेत.

रिलायंस ब्रांडस भारतातील सर्वात बडी लग्झरी आणि प्रीमियम रिटेलर रुपात प्रसिध्द असून गेल्या १४ वर्षात जगभरातील अनेक ब्रांडस त्यांनी विकसित केले आहेत. कंपनीचे एमडी दर्शन मेहता म्हणाले, भारतात फूड बेवरीज उद्योगाला प्रचंड संधी आहेत. देशातील ग्राहकात खाद्यपदार्थ संदर्भात जागृती होत असून रेडी टू ईटचा नवा ट्रेंड येऊ घातला आहे. भारतीय ताजे व ओर्गनिक पदार्थांचा आस्वाद घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यांची ही मागणी Pret A manger पूर्ण करू शकेल.