बेस्ट कॅम्पिंग साईट- चंद्रताल लेक
जुलै ते ऑक्टोबर हा सिझन हिमालयाच्या कुशीतील भटकंती साठी अतिशय योग्य मानला जातो. हिमाचल हे भारतातील जगप्रसिद्ध पर्यटन राज्य आहे आणि या राज्याकडे आता अनेक पर्यटकांची पावले पडू लागली आहेत. नेहमीच्या रुळलेल्या पर्यटन स्थळांपेक्षा कुठेतरी हटके भेट द्यायची असेल तर हिमाचलच्या लाहोल स्पिती या अतिरमणीय भागातील चंद्रताल लेकचा विचार तुम्ही नक्की करू शकता. बेस्ट कॅम्पिंग साईट म्हणून हे ठिकाण लोकप्रिय होत आहे.
भारतात काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अनेक सुंदर पर्यटनस्थळे आहेत. येथील मंदिरे, हिल स्टेशन, निसर्गरम्य स्थळे, इतिहासिक वारसा स्थळे या प्रमाणेच अनेक सुंदर सरोवरे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहेत. हिमाचल मध्ये गोड्या पाण्याची अनेक सुंदर सरोवरे असून त्यातील चंद्रताल हे एक आहे. समुद्सपाटीपासून सुमारे ४३०० मीटर म्हणजे ११ हजार फुटांवर असलेले हे सरोवर दिवसातून अनेक वेळा रंग बदलते. निळ्या रंगांचे गोड्या पाण्याचे हे सरोवर अर्धचंद्राकृती आकाराचे आहे आणि त्यावरून त्याला चंद्रताल असे नाव पडले आहे. यालचा मून लेक असेही म्हणतात.
थंडीच्या दिवसात येथे बर्फ खूप पडते त्यामुळे वर्षातले चार महिने येथे जाता येत नाही. स्थानिक लोकांसाठी हे सरोवर म्हणजे धार्मिक स्थळ आहे. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देतात. येथील पाणी काचेसारखे स्वच्छ आणि नितळ आहे. दोन मार्गांनी येथे जाता येते. एक मार्ग मनाली मधून येतो तर दुसरा मार्ग किन्नोर येथून येतो. मनाली मार्ग रस्ता मार्ग आहे तर दुसर्या मार्गावरून येताना ट्रेकिंग करून यावे लागते. हे सरोवर कधी काळी स्पिती कुल्लू साठी जाणाऱ्या तिबेटी आणि लडाखी व्यापारी लोकांसाठी महत्वपूर्ण स्थळ होते असे सांगतात.