धरमजींनी झाडलेल्या गोळीतून कानोकान बचावले होते बिग बी
बॉलीवूड लीजंड बिब बी उर्फ अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. आपल्या आयुष्यातील अनेक दिलचस्प घटना ते नेहमी शेअर करतात. कौन बनेगा करोडपतीचा नवा सिझन घेऊन बिग बी लवकरच पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने याच सेटवर दोन वर्षांपूर्वी बिग बी यांनी सांगितलेली एक आठवण शेअर केली गेली आहे. शोले चित्रपटातील हा किस्सा बिग बी यांनी सांगितला होता.
बिग बी सांगतात,’ चित्रपटाच्या एका सीनचे शुटींग सुरु असताना धर्मेंद्र यांनी रागाने खरी गोळी बंदुकीत भरून ती झाडली होती आणि ही गोळी बिग बीच्या कानाजवळून गेली आणि थोडक्यात त्यांचा कान बचावला होता. झाले असे की या सीन मध्ये धर्मेंद्र घाईने दारुगोळा आणि गोळ्या उचलून स्वतःच्या खिशात भरतो असा सीन होता. त्यावेळी धर्मेंद्र खाली तर अमिताभ पहाडावर उभे होते. गोळ्या उचलताना धर्मेंद्र यांच्या हातातून त्या सारख्या खाली पडत होत्या. त्यामुळे रागावलेल्या धरमपाजीनी गोळ्या एकदम बंदुकीत भरल्या आणि बंदूक उडविली. त्यामुळे बंदुकीतून उडालेली गोळी थेट बिग बी यांच्या कानाजवळून पास झाली.
निर्माते रमेश सिप्पी यांनी क्लायमॅक्सचा हा सीन खरा वाटावा म्हणून बंदुकीच्या खऱ्या गोळ्या आणल्या होता. त्यामुळे धर्मेंद्र यांनी उडविलेली गोळी खरोखरच अमिताभ यांना लागली असती तर बाका प्रसंग ओढवला असता अशी आठवण बिग बी यांनी शेअर केली आहे.