SEBI Penalty : SEBI ने NSE, चित्रा रामकृष्ण आणि इतर 16 जणांना ठोठावला 44 कोटींचा दंड


नवी दिल्ली : सेबीने 18 संस्था आणि व्यक्तींवर 44 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे, ज्यात स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया, त्याचे व्यवसाय विकास अधिकारी रवी वाराणसी, एनएसईचे माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण आणि त्यांचे सल्लागार सुब्रमण्यम आनंद यांचा समावेश आहे. प्रसिद्ध डार्क फायबर प्रकरणात सेबीने ही कारवाई केली आहे.

NSE आणि त्यांच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, SEBI ने ज्यांना दंड ठोठावला आहे, त्यात स्टॉक ब्रोकर वे टू वेल्थ ब्रोकर, GKN सिक्युरिटीज, संपर्क इन्फोटेनमेंट आणि त्यांचे अनेक कर्मचारी यांचा समावेश आहे.

शेअर बाजार नियामक सेबीने एनएसईला 7 कोटी रुपये, चित्रा रामकृष्ण, वाराणसी आणि सुब्रमण्यम आनंद यांना प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. उर्वरित रक्कम स्टॉक ब्रोकर कंपन्यांवर दंड ठोठावण्यात आली आहे.

नागेंद्र कुमार एसआरव्हीएस आणि देवीप्रसाद सिंग यांना प्रत्येकी एक कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने वे टू वेल्थ ब्रोकरला 6 कोटी रुपये, जीकेएन सिक्युरिटीजला 5 कोटी रुपये आणि संपर्क इन्फोटेनमेंटला 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

SEBI च्या वतीने या संदर्भात मंगळवार, 28 जून रोजी आदेश जारी करून प्रत्येकाला 45 दिवसांच्या आत दंड जमा करण्यास सांगण्यात आले आहे. डॉर्क फायबर प्रकरणात NSE च्या काही अधिकार्‍यांवर स्टॉक ब्रोकर्सना भेटून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे, SEBI ने तपासानंतर दंड ठोठावण्याची कारवाई केली आहे.