Rupee vs Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर, भूतानचे चलन नुगुल्ट्रमही आपल्यापेक्षा मजबूत


नवी दिल्ली – बुधवारी बाजार सुरू होताच भारतीय रुपया 11 पैशांनी घसरून 78.96 या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. विदेशी फंडांच्या सततच्या विक्रीमुळे रुपया दबावाखाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी सुरूच आहे.

रुपया 11 पैशांनी घसरून 78.86 वर आला आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 10.58 वाजता रुपया 78.89 वर व्यवहार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे बुधवारी भारतीय चलन भूतानच्या चलनाच्या खाली व्यवहार करत आहे. भूतान नुगुल्ट्रमचे चलन बुधवारी 78.375 वर व्यापार करत आहे.