Jawaan on OTT : या ओटीटीवर रिलीज होणार शाहरुख खानचा ‘जवान’, रिलीजपूर्वी केली एवढ्या कोटींची कमाई


शाहरुख खानचे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत. अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या आगामी ‘जवान’ चित्रपटाचा टीझर आणि मोशन पोस्टर रिलीज करून त्याच्या चाहत्यांना आनंदित केले आहे. त्याच वेळी, या चित्रपटाशी संबंधित आणखी एक बातमी समोर येत आहे, ज्यामुळे त्याचे चाहते आनंदाने उड्या मारतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने रिलीजपूर्वीच कोटींचा व्यवसाय केला आहे. कसे? वाचा आमचा अहवाल…

केली 100 कोटींहून अधिकची कमाई
मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की निर्मात्यांनी शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्म Netflix ला विकले आहेत. म्हणजेच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळाने शाहरुख खानचा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेकर्स आणि OTT प्लॅटफॉर्म Netflix यांच्यात सुमारे 120 कोटी रुपयांची डील झाली आहे.

शाहरुख खानचा हा पहिलाच चित्रपट आहे, जो संपूर्ण भारत स्तरावर प्रदर्शित होत आहे, ज्याची निर्मिती अभिनेत्याची पत्नी गौरी खान करत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, जवान ही एक सार्वत्रिक कथा आहे, जी भाषा, भौगोलिक क्षेत्राच्या पलीकडे आहे. हा चित्रपट सर्वांच्या आनंदासाठी आहे. हा चित्रपट बनवण्याचे श्रेय अॅटलीला जाते, हा माझ्यासाठीही एक चांगला अनुभव आहे कारण मला अॅक्शन चित्रपट आवडतात. पुढे काय होणार आहे याची झलक या टीझरमधून पाहायला मिळते.