के एल राहुलची शस्त्रक्रिया यशस्वी

टीम इंडियाचा उपकप्तान के एल राहुल याच्यावर जर्मनी येथे केली गेलेली ग्रॉइन सर्जरी यशस्वी झाली आहे. आयपीएल फ्रांचाइजी लखनौ सुपर जायंट्ने राहुल ला ‘लवकर बरा हो’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर टाकली होती त्याला उत्तर देताना राहुलने वरील माहिती सोशल मिडीयावर शेअर केली आहे. राहुल सोबत त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी जर्मनीला गेली आहे. राहुलचा जर्मनी मध्ये एक महिना मुक्काम असेल असे समजते.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने राहुल वेस्ट इंडीजच्या टीम निवडीच्या वेळी उपलब्ध राहील असे सांगितले जात आहे. अर्थात इंज्युरी मुळे टीम बाहेर जाण्याची राहुलची ही पहिली वेळ नाही. त्याचा हा इतिहास जुनाच आहे. गेल्या ८ महिन्यात याच कारणांनी राहुल पाच सिरीज मध्ये टीम इंडियाचा हिस्सा होऊ शकलेला नाही.

यावर्षी फेब्रुवारी मध्ये वेस्ट इंडीज बरोबरची टी २० सिरीज तो खेळू शकला नव्हता तसेच दुखण्यातून बरे न झाल्याने फेब्रुवारी अखेरीच्या श्रीलंका विरुद्धच्या टी २० आणि दोन कसोटी मध्येही तो संघाबाहेर होता. द. आफ्रिकेच्या पाच टी २० मध्येही त्यांचा सहभाग नव्हता.