Mumbai Building Collapse : मुंबईत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, 12 जण बचावले, 25 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती


मुंबई – मुंबईतील कुर्ला पूर्व, नाईक नगर येथे सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळली. बीएमसीच्या म्हणण्यानुसार ढिगाऱ्याखालून 12 जणांना बाहेर काढण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 25 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, इमारत जीर्ण झाली असून 2013 पूर्वी दुरुस्ती आणि नंतर पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या.

घटनास्थळी पोहोचले आदित्य ठाकरे
महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे मुंबईतील इमारत दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले आहेत. 5-7 जणांना वाचवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्व 4 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या, मात्र तेथे लोक राहत होते. सर्वांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी या इमारती खाली करण्याचे आणि पाडण्याचे काम पाहू आणि बीएमसीने नोटीस काढली की, इमारती स्वतःच रिकाम्या कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. अन्यथा अशा घटना घडतात, ज्या दुर्दैवी आहे, यावर आता कारवाई होणे गरजेचे आहे.