टेक्सास – अमेरिकेच्या टेक्सास राज्यात ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये 46 प्रवासी मृतावस्थेत सापडले आहेत. सॅन अँटोनियोच्या नैऋत्येस मृतदेहांनी भरलेला ट्रॅक्टर-ट्रेलर सापडला आहे. सॅन अँटोनियोच्या KSAT टेलिव्हिजनने वृत्त दिले आहे की, हे लोक दक्षिण टेक्सासमध्ये स्थलांतरित तस्करीच्या वेळी मारले गेले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
America : टेक्सासमध्ये ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये 46 मृतदेह आढळल्याने खळबळ
एएफपी या वृत्तसंस्थेने अमेरिकन मीडियाच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाउनटाउन सॅन अँटोनियोच्या दक्षिणेकडील सीमेवरील एका दुर्गम भागात रेल्वे रुळांजवळ मृतदेह असलेले वाहन सापडले. सॅन अँटोनियो पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. सॅन अँटोनियो येथील मेक्सिकन जनरल कॉन्सुलेटने सांगितले की कॉन्सुल जनरल रुबेन मिनुट्टी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
मृत नागरिक कोणत्या देशाचे आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही, गुदमरल्याने मृत्यू झाल्याची शक्यता
मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री मार्सेलो एब्रार्ड यांनी सांगितले की, पीडितांचे राष्ट्रीयत्व अद्याप समजलेले नाही. एबार्ड यांनी ट्विट केले की, टेक्सासमधील शोकांतिका. बंद ट्रेलरमध्ये गुदमरल्याने परप्रांतीयांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मेक्सिकोचे वाणिज्य दूतावास घटनास्थळी रवाना झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना.