प्रेग्नेंसीच्या बातमीनंतर आलियाने बदलला डीपी, युजर्स म्हणाले- हे प्रपोजलच्या वेळेचे फोटो आहे का?


रणबीर कपूर आणि आलिया भट्ट लवकरच आई-वडील होणार आहेत. अभिनेत्रीने सोमवारी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ही बातमी समोर येताच इंटरनेटवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. जिथे कुटुंबातील सदस्य, मित्र, सहकारी आणि चाहते तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. दुसरीकडे, आलिया भट्टने तिच्या प्रेग्नेंसीची माहिती दिल्यानंतर काही तासांनी तिचा इन्स्टाग्राम डीपी बदलला आहे.

जर तुम्ही हा डीपी नीट पाहिला तर तुम्हाला समजेल की, हा फोटो त्यावेळेचा आहे जेव्हा रणबीरने त्यांच्या व्हेकेशनमध्ये आलियाला लग्नासाठी प्रपोज केले होते. होय, या फोटोत जिथे आलिया रणबीरला मिठी मारत आहे, तिथे रणबीर हातात अंगठीचा बॉक्स धरलेला दिसत आहे.


रणबीरची आई नीतू कपूर यांनीही हाच फोटो सोशल मीडियावर शेअर करून दोघांचे अभिनंदन केले आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “God Bless” आलियाने नीतूच्या पोस्टवर कमेंट करत म्हटले की हा तिचा “आवडता फोटे” आहे.

नीतू कपूरने शेअर केलेला फोटो पाहून यूजर्स कमेंट सेक्शनमध्ये विचारू लागले की रणबीरने आलियाला प्रपोज केले त्या क्षणाचा हा फोटो आहे का? त्याचबरोबर काही यूजर्स नीतू कपूरला आजी झाल्याबद्दल अभिनंदन देत आहेत. तर काहीजण आलिया आणि रणबीरच्या फोटोंवर हार्ट इमोजी पाठवत आहेत.


आलियाची आई सोनी राजदान हिने देखील आलिया आणि रणबीरचे त्यांच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुट्टीतील दोन न पाहिलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोन्ही फोटो शेअर करत सोनीने लिहिले, ‘धन्यवाद.’ सोनी राजदानने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये रणबीर कपूर आलियासोबत सेल्फी घेताना दिसत आहे, तर दोघेही विंटर जॅकेटमध्ये आहेत. दुसऱ्या फोटोत, आलिया आणि रणबीर हिवाळ्यातील जॅकेट आणि वूलन कॅपमध्ये जंगल सफारीदरम्यान व्हॅनमध्ये बसलेले दिसत आहेत.