यंदाच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये फोनवर मिळणार बम्पर डिस्काऊंट
जागतिक पातळीवर स्मार्टफोनची घटलेली मागणी आणि रशिया युक्रेन सुद्धामुळे पूर्व युरोपातील स्मार्टफोन विक्रीवर झालेला विपरीत परिणाम याचा थेट फायदा भारतीयांना आगामी फेस्टीव्ह सिझन मध्ये होणार आहे. मार्केट ट्रॅकर्सकडून प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार भारतीयांवर आगामी उत्सव काळात ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही विक्री मध्ये बम्पर डिस्काऊंट आणि मस्त ऑफर्स ची बरसात होणार आहे. यामुळे नवीन फोन घेण्याच्या विचारात असणाऱ्यांनी थोडी प्रतीक्षा करणे फायद्याचे ठरेल.
या अहवालानुसार जगभरच महागाई आहे त्यामुळे फोनची मागणी कमी झाली आहे. यामुळे ब्रांडेड स्मार्टफोन कंपन्या त्यांच्याकडे पडून असलेला स्टॉक लवकर संपविण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या या कंपन्यांचे ५ ते ८ कोटी स्मार्टफोन अनसोल्ड आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात डिस्काऊंट आणि ऑफर्स दिल्या गेल्या होत्याच पण २०२२ च्या दुसऱ्या तिमाहीत ऑनलाईन डिस्काऊंट सेलची संख्या सुद्धा वाढलेली दिसली. आगामी काळात हाच ट्रेंड राहील आणि स्मार्टफोन ब्रांडस त्यांचे झालेले नुकसान भरून काढण्याच्या प्रयत्नात राहतील.
परिणामी ऑफलाईन आणि स्वतःचा वेबसाईट वर कंपन्या आकर्षक ईएमआय योजना आणू शकतात, स्टॉक संपविण्यासाठी मोठे डिस्काऊट देऊ शकतात. या ब्रांडनी जून मध्ये ऑफलाईन रिटेलर्सचे मार्जिन वाढविले आहे त्यामुळे या रिटेलर्स कडून सुद्धा ग्राहकांना मोठे डिस्काउंट दिले जातील. स्थानिक बाजारात चीनी फोन कंपन्यांचा मोठा स्टॉक उपलब्ध असून त्यातीलच काही स्टॉक भारतीय बाजारात आणला जाईल. एकट्या सॅमसंगचे ५ कोटी स्मार्टफोन्स अनसोल्ड आहेत असेही या अहवालात नमूद केले गेले आहे.