Indian Army Recruitment : तरुणांना सैन्यात नोकरीची संधी, 458 पदांची भरती


सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय सैन्यात एक सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. इंडियन आर्मी एएससी सेंटरने फायरमन, कुक यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठीचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने असतील. या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार त्यांचे अर्ज अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यात दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. चला जाणून घेऊया या भरतीची संपूर्ण माहिती…

कधीपर्यंत करता येईल अर्ज ?
भारतीय सैन्यात या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरतीसाठी अर्ज जाहिरात जारी झाल्यापासून 21 दिवस सुरू राहील. या भरतीची जाहिरात 25 जून 2022 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी त्यांचे अर्ज करावेत.

अनेक पदांवर आहे भरती
भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या भरतीसाठी रिक्त पदांची संख्या 458 निश्चित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सिव्हिलियन केटरिंग इंस्ट्रक्टर, फायरमन, एमटीएस, कुक, फायर इंजिनिअर आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. उमेदवारांकडून 10वी आणि 12वी उत्तीर्ण पात्रता मागविण्यात आली आहे. त्याचबरोबर पदांनुसार वयोमर्यादा वेगळी मागितली आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी / प्रात्यक्षिक चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. अधिक माहितीसाठी, उमेदवार भरतीची अधिकृत अधिसूचना पाहू शकतात – भारतीय सैन्य भरती

कसा करावा अर्ज ?
या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी सर्व माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज पोस्टाद्वारे The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) – 2 ATC/ASC Centre (North)-1 ATC Agram Post, Bangalore -07 येथे पाठवणे आवश्यक आहे.