Hotvav w १० स्मार्टफोन आला, १५ हजार एएमएच बॅटरी सह
सध्या स्मार्टफोन बाजारात एका नवीनच फोनची चर्चा सुरु झाली असून हा रग्ड स्मार्टफोन, Hotvav w १० नावाने बाजारात दाखल झाला आहे. या फोनची खासियत आहे त्याची १५ हजार एमएएचची बॅटरी. ही बॅटरी १२०० तासांचा स्टँडबाय देते असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत सध्या ९९.९९ डॉलर्स म्हणजे ८ हजार रुपये असून प्रोमो नंतर यांची किंमत १३९ डॉलर्स म्हणजे ११ हजार रुपये असेल. २७ जून पासून या फोनची विक्री सुरु होत आहे. ओरेंज आणि ग्रे अश्या दोन रंगात हा फोन उपलब्ध आहे.
या फोन साठी ६.५३ इंच एच डी प्लस डिस्प्ले, ४ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज, मायक्रो एसडी कार्डने ते ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा अशी फीचर्स आहेत. रिअरला १३ एमपीचा ड्युअल कॅमेरा सेट आणि फ्रंटला सेल्फी साठी ५ एमपीचा कॅमेरा दिला गेला आहे. फोनची बॅटरी २८ तास व्हिडीओ प्ले बॅक टाईम देते.
या फोनची आणखी एक खासियत म्हणजे त्याला १८ डब्ल्यू वायर्स चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट आहे. रिव्हर्स चार्ज फंक्शन मध्ये फोन मिनी पॉवर बँकेत बदलतो. म्हणजे आणीबाणीची वेळ आल्यास या फोनवरून दुसरी डिव्हायसेस चार्ज करता येतात. सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर, फेस रेकग्नीशन टेक्नोलॉजी सिस्टीम आहे. जीपीएस, ग्लोनस, बिडो व गॅलिलीओ अशी चार सॅटलाईट नेव्हिगेशन सिस्टीम आहेत. हा फोन वॉटर रेझिस्टंट आयपी ६८/ आयपी ६९ के सर्टिफिकेट सह आहे.