कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ, 21 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या सोमवारच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 17,073 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे कालच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्यांनी जास्त आहे. त्याच वेळी 21 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. कालच्या आकडेवारीत 11,739 प्रकरणे नोंदवली गेली आणि 25 रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, गेल्या 24 तासांत 15,208 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 94,420 वर पोहोचली आहे, जी कालच्या तुलनेत 1,844 अधिक आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 52,50,20 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत 666 नवे कोरोना रुग्ण
गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाचे 666 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, संसर्ग दर 7.8 टक्के नोंदवला गेला. एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 4717 आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे गेल्या एका आठवड्यात 17 जून रोजी दिल्लीत 190 कंटेनमेंट झोन होते, जे 24 जूनपर्यंत 322 पर्यंत वाढले आहेत.