आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच आई-वडील होणार आहेत. होय, सोमवारी सकाळी स्वत: आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून ती गर्भवती असल्याचा खुलासा केला आहे. या फोटोमध्ये आलिया रणबीरसोबत हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. लव्हबर्ड्स स्क्रीनकडे पाहत आहेत, जिथे हार्ट बनले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “आमचे बाळ… लवकरच येत आहे.”
Alia Bhatt : आलिया भट्ट आई होणार आहे का? रणवीर कपूरसोबत शेअर केली गुड न्यूज
सोनोग्राफी चित्रासोबतच, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सिंह आणि सिंहिणी त्यांच्या पिल्लांसह दिसत आहेत. निसर्गावरील प्रेम सांगून या जोडप्याने हे स्पष्ट केले आहे की दोघे लवकरच आई-वडील होणार आहेत.
रणबीर आणि आलियाने यावर्षी 14 एप्रिल रोजी त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले आणि आता दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली आहे.